Formation of team of Certified Financial Consultants.
संघ बांधणीमाझी नियुक्ती जरी पुणे विभागात झाली असली तरी मला मुंबई ऑफिस ला रिपोर्ट करायचे होते, व त्यासाठी जानेवारी एकवीस तारखेला मुंबईला गेलो. एच आर डिपार्टमेंट मधे आवश्यक गोष्टींची पूर्तता करून मी वैभव काळे ना भेटलो. माझा विविध विभागातील लोकांचा परिचय कामाचे स्वरूप याची माहिती करून दिली . दुसर्या दिवशी वैभव आणि दिलीप दोघांनी कामाची व्याप्ती व त्यासाठी त्यांनी तयार केलेला मास्टर प्लॅन समजाऊन सांगितला . दोघांनी ही ग्रामीण भागात आपण कसे पोचणार आहोत याचा आराखडा तयार केला होता. पहिल्या वर्षी संपूर्ण भारतात फक्त पुणे, नागपूर ,नाशिक, पानिपत, अमरावती आणि विजय वाडा ब्रँच मधे ग्रामीण भागातील व्यवसायाची सुरुवात करणार होतो. कॉर्पोरेट ऑफिस मधील ट्रेनिंग झाल्यावर मला ठाणे शाखेत पाठवले तिथे मला काही विकास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात कामाचे स्वरुप agent'निवडीचे प्रक्रिया त्यासाठी लागणारी पात्रता कागदपत्रे यांची व्यवस्थित माहिती दिली. माझी काही agent बरोबर भेट ही झाली त्यातुन मला बरीच माहिती मिळाली. शेवटच्या दिवशी मी परत वांद्रे येथील मुख्य ऑफिस मधे गेलो, मी आणि वैभव काळे दोघांनी मिळून पुढील प्लान ठरवला हातामधे फक्त 58 दिवस होते ,त्याआधी agent's चि निवड irda शंभर तासाचे प्रशिक्षण ,परीक्षा आणि लायसन्स करून घेणे आणि मगच व्यवसाय सुरू करता येत होता . प्रत्येक दिवस हा महत्त्वाच्या होता .वेळ हातात कमी असल्यामुळे वृत्तपत्रामध्ये जाहिरात करण्याचे ठरविले. मराठीमधे जाहिरातीचा मजकुर आम्ही दोघांनी तयार केला व प्रसिद्धी विभागातील टीम कडे दिला .मी मुंबई वरुन निघण्याआधी पुण्याचे शाखा प्रमुख श्री सुदीप मित्रा यांच्याशी फोन वर ओळख करून दिली होती, त्यामुळे मी पुण्यातील शाखेत आल्यावर त्यांनी माझे हसत मुखाने स्वागत केले .माझे डायरेक्ट रिपोर्टींग पुण्यात नव्हते कारण आमचे ग्रामीण भागात काम असणार होते, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी मला एक स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून दिला व काहीही मदत लागल्यास नि संकोचपणे बोलण्यास सांगितले. ईतर पुण्यातील मॅनेजर सहकार्यांनी महेश, जीत राजीव ,थॉमस, व ईतर सर्व पण माझे हसत मुखाने स्वागत केले.
आधी ठरल्या प्रमाणे आमची जाहिरात मराठी वृत्तपत्रात झळकली, पुणे ब्रँच मधे 28 ते 29 तारखेला विमा सल्लागार नेमणुकी साठी थेट कागदपत्र घेऊन यायचे होते ,शाखेचा फोन आणि पत्ता,आणि पात्रता याविषयी सविस्तर माहिती आली होती. सकाळ पासुन च फोन सतत येत होता आणि मी त्यांना उत्तर देत होतो कमीत कमी शंभर सव्वाशे लोकानी फोन केले असतील, बाहेर स्वागत कक्षातील अविनाश नि पण खूप फोन घेऊन मला मदत केली .एकंदर परिस्थिती आणि प्रतिसाद पाहता सुदीप सरांशी बोलून शाखेच्या तिसर्या मजल्यावर एक मोठा प्रशिक्षण वर्ग होता तिथे आलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली . वैभव सर पण आदल्या दिवशीच पुण्यात आले होते ,आम्ही दोघे लवकरच ऑफिस मधे पोहोचलो. सकाळीच सव्वा नऊ पासुन च इच्छुक उमेदवार यायला सुरूवात झाली होती ,तेंव्हा वेळ न दवडता आम्ही मुलाखती घेण्यास सुरुवात केली. साधारण पाच सहा जणांना भेटल्यावर मला साधारण उमेदवारांची निवड कशी करायची याची कल्पना आली .तोवर बाहेर लोकांची गर्दी वाढत होती, तासाभरात पन्नास च्या वर लोक बाहेर आले होते काही अर्थातच पूर्ण जिल्हा मधून लांबून आले होते त्यामुळे त्यांना जास्त वेळ थांबवता येणार नव्हते मग मी आणि वैभव सरांनी एकत्र न घेता दोन कक्षात विभागून मुलाखती घेण्यास सुरुवात केली. आम्ही उमेदवार निवडीसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवली होती, व त्यानुसारच लोकांशी बोलत होतो व त्याप्रमाणे मुलाखती चालल्या पहिल्या दिवशी संध्याकाळी सात पर्यंत ! दुसर्या दिवशी वैभव काळे नागपूर ला गेले कारण तिथेही माझा सहकारी निखील अभ्यंकर त्याच्या संघ बांधणी साठी त्यांची वाट पहात होता. मग मी एकट्याने पुढे काम सुरू केले दुसर्या दिवशी ही खुप जण आले ,आणि मुख्यतः परगावाहून आलेले असल्यामुळे सर्वांना योग्य वेळ देणे खुप आवश्यक होते, दुपारी गर्दी वाढू लागल्यावर, मला सुदीप ने ब्रँच मधील मॅनेजर ना मुलाखतीसाठी मदत घेण्याचे सुचवले . सर्वानी सहकार्य केले .सर्व मिळून जवळ जवळ अर्धा सहस्र लोकांना आम्ही भेटलो होतो त्यातून आता संभाव्य उमेदवार निवडायचे होते .ग्रामीण भागात काम असणार होते त्याप्रमाणे मी तालुकावार विभागणी केली जेणेकरून पुणे जिल्ह्यात सर्व भागात आपल्याला प्रतिनिधी मिळतील. सर्व अर्जांची छाननी करून संभाव्य यादी तयार केली व त्याप्रमाणे त्यांना फोन करून कळवले . सगळ्यात जास्त आव्हान होते ते Irda ट्रेनिंग, कारण सर्वांना पुण्यामधे येऊन शंभर तासाचे क्लास रूम ट्रेनिंग घेणे अनिवार्य होते जे 13 दिवस होते, त्याप्रमाणे अंतिम यादी पराग पंडित ना मुंबईला पाठवली. एकुण साठ जणांची भली मोठी यादी होती. ही सर्व मंडळी पुण्यात येऊन आपापली राहण्याची व्यवस्था करणार होती ,बर्याच जणांना इच्छा असून जमले नाही कारण नातेवाईकांकडे आपण दोन दिवस चार दिवस राहू शकतो पण पंधरा दिवस राहणे अवघड असते. दुसरा मुख्य अडथळा म्हणजे नुसते ट्रेनिंग करून भागणार नव्हते तर नंतर त्यावर परीक्षा होती त्यातून पास झाले पाहिजे . ह्यामुळे सुद्धा काही मंडळीनी, नकार दिला. साहजिकच आहे कारण बर्याच जणांनी आता ह्या वयात कशाला कुठली परीक्षा द्यायची? तेरा दिवस हातातलं काम सोडुन रजा घ्यायची पुण्यामधे नातेवाईकांना त्रास देऊन मुक्काम करायचा आणि एवढे करूनही पास नाही झालो तर होणारी नाचक्की...ह्यामुळे असावे म्हणुन बरीच जण येतो सांगून ही ऐनवेळी आली नाहीत, तरीही चार फेब्रुवारी ला पहिली बॅच MIT कॉलेज च्या भव्यदिव्य अशा प्रांगणात सुरू झाली. काहीजण सासवड चाकण जेजुरी दौंड तळेगाव लोणावळा वरुन ये जा करणार होती त्यामुळे सर्वानी आमच्या ब्रँच जवळ यावे व तेथून बस ची सोय केली होती त्यामुळे सर्वाना सोयीचे झाले.
पहिल्या दिवशी स्वतः सुदीप मित्रा साहेबांनी येऊन प्रस्तावना करत सर्वांचे स्वागत केले व अभिनंदन करून सर्वानी विमा सल्लागार होण्याचा योग्य निर्णय घेतला आहे हे पटवून दिले त्यामुळे सगळ्याना प्रोत्साहन मिळाले . मलाही ह्या बॅच बरोबर राहून ट्रेनिंग घ्यायचे होते आणि परीक्षा उत्तीर्ण करायची होती ,कारण जर मला विमा क्षेत्रात काम करायचे असेल तर त्याची सखोल माहिती पाहिजेच असा आमच्या कंपनी चा दंडक होता.
Mit चा शैक्षणिक परिसर हा फारच विलोभनीय होता भव्य क्रीडांगण मोठा स्तूप असतो त्याप्रमाणे विशाल पोर्च आणि डोळ्याचे पारणे फेडणारी पहातच रहावे अशी मोठी माऊलींची ध्यानस्थ प्रसन्न मुर्ती होती . साहजिकच नतमस्तक झालो. क्लास रूम सुध्दा अद्ययावत होती हवेशीर मोकळी जागा मुबलक प्रकाश आणि शिकवण्यासाठी खास एलआयसी मध्ये काम केलेली अनुभवी जाणकार मंडळी, श्री पालव सर आणि श्री साठे ह्यांनी खुप छान प्रकारे आमचे ट्रेनिंग घेतले. ग्रामीण भागातील बॅच असल्यामुळे सोप्या मराठीत हसत खेळत आमचे तेरा दिवस ट्रेनिंग झाले व त्यावर असलेली परीक्षा निर्विघ्नपणे पार पडली .
परीक्षा सर्व जण पास झाले पण हातात लायसन्स येण्यासाठी वेळ लागला व तेरा मार्च ला माझी टीम अधिकृतपणे तयार झाली. त्यानंतर सर्वांना आमच्या कंपनी च्या products आणि Process च्या ट्रेनिंग चे आयोजन केले
वैभव सरांनी त्यासाठी खास विनंती ट्रेनिंग विभागातील Frederick सरांना केली त्यांनी मुंबई हुन खास येऊन दोन दिवस पुण्याला राहूनआम्हाला विविध प्रॉडक्ट शिकवले आणि कसे विकायचे याचे बारकावे समजाऊन सांगितले. युगंधरा ही त्यावेळेस सर्व फॉर्म्स प्रोसेसिंग पाहत असे, तिने सर्वांना अर्ज कसा भरावयाचा, कागदपत्रे काय काय लागतात याची माहिती करून दिली. सर्व जण दोन दिवसांत आवश्यक ती सगळी माहिती घेऊन आप आपल्या गावाकडे रवाना झाले.
आता सर्व सोपस्कार पार पडले होते,आणि आता खरे काम सुरू होणार होते .दुसर्या दिवशी वैभव सरांचा फोन आला त्यावेळी मला समजले की ज्यानी दोन दिवस पुण्याला येऊन ट्रेनिंग दिले ते Fredrick D'Souza सर ज्यावेळी पुण्याला आले होते त्यावेळी त्यांची आई मुंबईत दवाखान्यात आयसीयूमध्ये अॅडमिट होती व ऑपरेशन होते पण काम सगळ्यात आधी म्हणुन त्यांनी घरातील इतर मंडळी वर ती जबाबदारी सोपवून फक्त आमच्या बॅच साठी पुण्याला आले होते. हे ऐकल्यावर मला धक्काच बसला. मी लगेच त्यांना फोन लावून त्यांची विचारपूस केली ,व मनोमन आभार मानले. देवाच्या कृपेने ऑपरेशन चांगले झाले व त्यांच्या आई सुखरुप घरी आल्या.
अशा प्रकारे कामाच्या जबाबदारी साठी स्वतः च्या नात्यापेक्षाही काम महत्त्वाचे असते हे त्यांच्या कृती मधुन दिसून आले. अशा माणसांना देव कायम आव्हाने देऊन कसोटी घेतो व ते त्यात पूर्ण पणे यशस्वी होतात.अशा प्रकारे कामे करणारे वरीष्ठ पाहुन मला माझ्यावरील जबाबदारी ची जाणीव झाली.व कामाचा उत्साह आला.
माझ्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाच्या घटक जो माझी आयुष्यभर कायमस्वरूपी साथ करण्यास आला तो म्हणजे माझा मोबाईल माझ्याकडे आला तो कायमचे राहण्यासाठी .
ठरल्याप्रमाणे सर्वानी गेल्याबरोबर कामाला सुरुवात केली, त्यावेळी सर्वांकडे मोबाईल नव्हते ,आणि इनकमिंग सुध्दा पैसे लागत असत .सर्वजण मला मोबाईल वर रिंग करत, मग मी त्यांना ऑफिस मधून कॉल बॅक करत असे . संपूर्ण ब्रँच मध्ये माझ्या टेबल वर फक्त परगावी कॉल करण्यासाठी एसटीडी सुविधा होती , माझ्या सहकार्यांना त्याचा कधी कधी हेवा वाटायचा .
फॉर्म भरताना प्राथमिक माहिती डायरी मधे लिहून कागदपत्रे पडताळून माहिती चि खातरजमा करणे फॉर्म व्यवस्थित न चुकता भरणे वगैरे सर्वांना सांगितले. आर्थिक वर्ष संपवण्यासाठी हातामधे फक्त आठ दिवस राहिले,होते अशा स्थितीत जे काही तुम्ही आत्तापर्यंत शिकला आहात त्याच्या बळावर आपला व्यवसाय सुरू करून किमान आपला पहिला प्रपोजल फॉर्म दाखल करावा असे मी सर्वांना आवाहन केले. आणि माझ्या टीम ने मार्च अखेरीस आठ दिवसात चव्वेचाळीस प्रपोजल फॉर्म्स दाखल केली व सर्व पॉलिसी इश्यू पण झाल्या. सर्वात जास्त अकरा पॉलिसी टाकून प्रसन्न राज पंडय़ा जी टॉपर झाले.
माझी टीम वैशिष्ठ्य पूर्ण होती ह्यात शिक्षक, गृहिणी,बँक कर्मचारी, कर आणि वित्त सल्लागार, बांधकाम व्यावसायिक ,पोस्टल एजंट, वाहतूक क्षेत्रातील आणि शेतकरी आणि डॉक्टर ,सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी, सर्व दूर क्षे त्रात पोहोचण्यासाठी त्या समूहातील माणूस घेतला म्हणजे आपोआप आपल्याला त्या समूहातील लोक जोडले जातात ह्या उद्देशाने मी सर्व क्षेत्रात काम करणार्या लोकांना संधी दिली आणि त्या सर्वानी माझा विश्वास सार्थ केला.
मित्रानो!!आयुर्विमा क्षेत्रात काहीही अनुभव नसताना मी माझी यशस्वी वाटचाल करू शकलो आज अठरा वर्षानी ह्या गोष्टी गम्मत शीर वाटतील पण जर सखोल विचार केला तर आज ही बर्याच जणांना त्याचा फायदा होत आहे ,आणि . म्हणुन मी सर्व सविस्तर जसे घडले तसेच मांडले आहे .लवकरच माझा "How to select an Insurance Advisor" हा YouTube व्हीडिओ प्रकाशित होत आहे जरूर बघा. आणि हा लेख कसा वाटला ते पण कळवा !!अभिप्राय जरूर कळवा
शिरीष शरद पाटील
Mbl:9890 333 611
FB:#salestipsbyshirish
#sellingideasbyshirish