नमस्कार बावीस नोव्हेंबर तारीख माझा प्रकट दिन,म्हणजेच वाढदिवस लॉक डाऊन मध्ये वाढदिवस घरीच साजरा केला.सर्व मित्र मैत्रिणी सहकार्यांनी शुभेच्छा संदेश व फोन आवर्जून करून माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
लहानपणी फारसे आठवत नाही ,त्याकाळात वाढदिवस केक वगैरे विशेष फॅड नव्हते, घरातल्या घरातल्या आवडीची पक्वान्ने बनवून करत असत .मला आठवतय मी पहिल्या वर्गात होतो त्यावेळेस माझा वाढदिवस साजरा केला होता.माझा एक वर्ग मित्र जो घराच्या जवळ राहत होता सकाळी घरी आला ,त्यावेळी आमचे औरंगाबाद ला खूप मोठे एकत्र कुटुंब होते,व त्याने मला हस्तांदोलन केले व शुभेच्छा दिल्या, त्याकाळी घरातील सर्वांना खुप आश्चर्याचा धक्का बसला, व कौतुक ही वाटले. मग लगेच आईने कांदा पोहे व शिरा केला त्याच्यासाठी, सर्व खाऊन 'तृप्त' झाल्यावर त्याने हाफ पँट मध्ये लपवलेला पार्ले बिस्कीट पुडा (मूल्य फक्त 10पैसे )सगळा तुला बरका..असे म्हणुन दिला होता. हा मला आठवणारा माझा पहिला वाढदिवस.!!!!! नंतर आई ,आजी,आजोबा, काका आणि मावशी ,आत्या घरच्याघरी करत असत, माझ्या आवडीची बटाटा भाजी, शिरा किंवा इडली सांबार असा माझा आवडीचा बेत असे . पण ह्याबरोबरच तू आता ईतक्या वर्षाचा...(----)झाला, असा धाक युक्त इशाराही मिळत असे. एका वाढदिवसाला मला तीनचाकी सायकल ही मिळाली होती ,वडिलांकडून ,पण त्याबरोबर रोज पाढे पाठ करणे, शुद्धलेखन ह्याचे वचन घेण्यास सगळेच विसरले नव्हते. तसा पुढच्या पिढीतला पहिला त्यामुळे आजी लाड करायची .
वाढदिवस लक्षात ठेवून मला कायम शुभेच्छा देणारी एकमेव व्यक्ति म्हणजे मावसभाऊ प्रशांत खांबसवाडकर ,त्या काळी आंतरदेशीय पत्र मिळायचे 25 पैशाला तो आठवणीने वाढदिवशी मिळेल असे पाठवतअसे,कधीही नेम चुकला नाही, तो आज ही चालू आहे. आता पण रात्री 12 च्या आत फोन येतोच!!!
नोकरीमध्ये असताना बरेच वाढदिवस साजरा केले गेले, माझे सहकारी,माझ्या विविध ठिकाणी असणार्या टीम, व्यवसाय मित्र,आप्तेष्ट,वरीष्ठ वगैरे सगळ्यानी खूप प्रेमाने वाढदिवस साजरे केले. गेल्या पंधरा वीस वर्षात जरा जास्तच जोरात साजरा होतो आधी बायको आणि आता मुलीच्या उत्साहाने, माझा उत्सव मुर्ती दर वर्षी होतो. पूर्वी स्वतः साठी आता सर्वाना खुष करण्यासाठी!!!
आठ वर्षापुर्वी सगळे बंधन सोडून मी कॉर्पोरेट जगातील नौकरी ला रामराम केला होता. काहीतरी स्वतः चे सुरू करण्याचा उद्देश. आणि 22 नोव्हेंबर 2013 ला कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये काम करायला सुरवात केली आता ह्यात स्थिरावलो आहे. पण पुढे काय ? असा प्रश्न पडतो तेव्हा
"देणार्याने देत रहावे...घेणार्या घेत रहावे घेता घेता एक दिवस देणाऱ्या चे हात च घ्यावेत " ह्या नुसार माझ्या अनुभवाचा फायदा नवीन पिढीला व्हावा असे वाटते..
लॉक डाऊन मध्ये एक चांगले पुस्तक वाचनात आले,निलेश साठे सरांचे !"साठे उत्तरांची कहाणी" त्यांचीही माझ्याप्रमाणेच विमा क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द , फरक इतकाच की मी विमा क्षेत्रात खाजगीकरण झाल्यावर काम केले व ते आधीपासून अजूनही करत आहेत.
त्या वरुनच स्फूर्ती घेऊन संकल्प
करतोय लिहिण्याचा, मला कल्पना आहे की हे शिवधनुष्य पेलणे सोपे नाही पण प्रयत्न करण्यास काही हरकत नाही . माझ्या आयुष्यात मला भरभरून मिळाले व माझे जे काही प्राप्त अनुभवा च्या शाळेत शिकलेले अनुभवाचे भांडार आहे ते मी काहीही राखून न ठेवता आतापर्यंत शक्य तेवढे देण्याचा प्रयत्न केला आहे.
आज जेव्हा मी बॅंकिंग विमा क्षेत्रात प्रशिक्षण करतोय तेव्हा जी 'लढाई पाहतोय तेव्हा कुठेतरी, भरकटलेल्या जहाजाच्या प्रमाणे तरुण मंडळी तणाव खाली कामे करताना दिसतात, फास्ट फूड,सारखे लगेच निकाल अपेक्षित आहेत ,सर्वांना जमतेच असे व अपयशाने ,बरीच युवा पिढी दूर जात आहे .हे पाहून मन खिन्न होते.
माझ्यावर प्रेम करणा र्या माझ्या अनेक सहकार्यांना मित्राना व तरुण पिढीला माझ्या अनुभवाचा लाभ व्हावा असे वाटते. व माझ्या काही जवळ च्या आप्तेष्टां च्या आग्रहाने लिहिण्याचा मानस करतोय..अभिप्राय व सुचना नक्की सांगा कळवा म्हणजे पुढे लिहायचे कसे हे ठरवता येईल
आपला
शिरीष शरद पाटील
पुणे
9890 333 611