Shirish Sharad Patil Soft skills & Behavioral Coach & Corporate Training Consultant
Saturday, 20 June 2026
नवीन आर्थिक वर्षासाठी एचआरची धोरणात्मक भूमिका आणि नियोजन – सहकारी बँकिंग क्षेत्र
Saturday, 28 March 2026
मार्च-आर्थिक वर्षपूर्ती शेवटच्या दिवसाची लगबग आणि आव्हाने.!
नमस्कार मित्रानो!
आज आपण अशा वेळी भेटत आहोत की सर्वच आर्थिक संस्था, जसे आपली बँक सुद्धा यात मोडते , आर्थिक वर्ष पूर्ण होत आहे आणि सर्व जण व्यस्त असाल . मागील लेखामध्ये आपण ग्राहकाभिमुख सेवा कशी आपल्या हिताची आहे याविषयी चर्चा केली, व ग्राहक हा केंद्रबिंदू मानून सर्वच विभाग कशी तत्पर सेवा देऊ शकतात याविषयी ऊहापोह केला होता., आणि त्याचा सर्वागीण बँकेच्या प्रगती साठी उपयोग होत असतो, हे देखील पाहिले . बँक कारभार हा दोन खांबावर मजबूत पणे चालतो ते म्हणजे कर्ज वितरण आणि बँकेतील ठेवी. प्रत्येक बँकेसमोर दोन्हीचा योग्य समतोल साधणे हे मोठे आव्हान असते , आणि ह्या सर्वाचा लेखाजोखा वर्षअखेरीस म्हणजेच आर्थिक वर्ष संपताना मांडला जातो, आणि त्यावरच बँकेचे मूल्यांकन केले जाते. त्यामुळे प्रत्येक विभागाने वर्षाच्या सुरवातीस त्यांना नेमून दिलेले उद्दिष्ट साध्य करणे स्वाभाविक असते. कुठेही कमी पडत असेल तर त्यामुळे बँकेच्या एकंदर व्यवसायावर आणि ताळमेळ वर परिणाम होतो अशा परिस्थितीत जर योग्य पाऊल उचलली नाहीत तर वर्षभराची संपूर्ण मेहनत वाया जाऊ शकते. त्यामुळे सर्वावर कामाचा ताण अधिक वाढू शकतो.
बँकेचे उत्पन्न आणि खर्च ह्यावर नफा अवलंबून असतो त्यामुळे जेवढा नफा अधिक आणि खर्च कमी तेवढा जास्त चांगले कारण ज्या भागधारकांनी विश्वासाने बँकेच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना त्याप्रमाणे लाभांश वितरित करू शकतो. त्यामुळे थकीत कर्ज वसुली जोमाने केली जाते कारण त्यामुळे NPA ratio कमी होतो. यावेळी वसुली अर्थात रिकव्हरी विभागावर मोठा ताण असतो. आणि सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या ग्राहकांना न दुखावता कर्जाची वसुली करणे एक मोठे आव्हान असते, हितसंबंध पण सांभाळायचे असतात अशा प्रसंगी, शांत डोक्याने संयम बाळगुन काम करावे लागते आणि, योग्य पद्धतीने संवाद करावा आणि काम करावे, कुठेही आवाज न वाढवता आपले उद्दिष्ट साध्य करावे. जेवढे NPA(Non performing Assets) कमी तेवढे आपल्या सर्वांच्या दृष्टीने हिताचे व आपण RBI च्या निर्बंधापासून दूर राहतो,ही बाब सर्व कर्मचारी, ग्राहक आणि संचालक मंडळानी लक्षात घेतली पाहिजे.
बँकेची आर्थिक स्थिती जेवढी मजबूत तेवढे व्यवसाय वृद्धीसाठी वाव असतो. त्यामुळे अधिकाधिक ग्राहक आणि मुदत ठेवी मिळवणे, ह्यासाठी पण आपल्या ला सतर्क रहावे लागते, त्यासाठी जर वरिष्ठांकडून सूचना आली तर त्यासाठी आपल्या ग्राहकांना सूचित करणे,व त्याप्रमाणे त्यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करावे लागते,मित्रानो ह्यासाठी आपण वर्षभर चांगल्या सेवेची पेरणी केलेली असेल की तर त्याचा निश्चित फायदा होतो.
कुठलेही काम वेळच्या वेळी केले की शेवटी त्याचा ताण येत नाही हे सर्वांना माहीत आहे पटते पण...काही वेळा चालढकल केली जाते आणि मग ऐनवेळी एकदम सर्व कामे करून ते पण काम करावे लागते ,अशा वेळेस, कामाचा ताण येतो,आणि मग उशीरपर्यंत थांबणे, जास्त काम करावे लागते आणि ते टाळता येत नाही.
ऑडिट टीम कडून काही अहवाल,गोष्टींची मागणी केली जाते त्या ही वेळच्या वेळी पूर्ण कराव्या लागतात,कारण बँकेला सुद्धा RBi ला र काही अहवाल , माहिती वेळेत देणे आवश्यक असते
एकंदर सर्व काही वेळेवर करून सुद्धा काही त्रुटी वर्षभरात राहू शकतात अशावेळी ,चिडचिड न करता ,शांत पणे संयम ठेऊन काम करावे,कारण त्या पासून पळवाट नसते हे लक्षात घेतले पाहिजे.
आज जवळ जवळ सर्व च सहकारी बँकेमध्ये ऑनलाईन व्यवहार पण होतात,आणि त्या संगणकीय व्यवस्थेवर जास्त कामाचा ताण येऊ शकतो,सर्वर कधी कधी down होऊ शकते, किंवा त्याची गती कमी होते,अशा वेळेस बँकेतील IT विभागाकडे वारंवार सिस्टम पूर्णपणे कार्यरत राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे,जास्त काम अपेक्षित धरून योग्य ती काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून शेवटच्या दिवसापर्यंत काम सुरळीत आणि योग्य गतीने चालू राहील.
आता मित्रानो सर्वात महत्वाचे ह्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या मासिक उत्सवात काय उपाययोजना किंवा काय करावे यासाठी काही अनुभवाचा उपयुक्त सल्ला येथे दिल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकत नाही.
वर्षअखेरीचा कामाचा ताण व्यवस्थापित करण्यासाठी येथे काही टिप्स :
सर्वप्रथम स्वतःची काळजी घ्या:- *पुरेशी झोप घ्या*( घरी) लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी ७-८ तास झोप घेण्याचे ध्येय ठेवा.
- *पौष्टिक आहार घ्या*: ऊर्जेची पातळी टिकवून ठेवण्यासाठी पौष्टिक अन्नाने शरीराला ऊर्जा द्या.आणि वेळेवर खा. वडा पाव नाही,एक संध्याकाळचा अधिक नाश्त्याचा घरगुती डबा आणण्यास सुरू करा कारण नेहमीपेक्षा जास्त थांबावे लागते.
- *विश्रांती घ्या*: ताण कमी करण्यासाठी आणि ताजेतवाने होण्यासाठी विश्रांतीचा वापर करा. काम चालुच राहील, मध्ये छोटा पाच दहा मिनीटची छोटी सुट्टी,बँकेच्या बाहेर एक चक्कर मारून या,सहकाऱ्यांशी मोकळेपणे बोला.
वास्तववादी ध्येये निश्चित करा*: दिलेल्या वेळेत काय साध्य केले जाऊ शकते याबद्दल वास्तववादी रहा.
संबंधित व्यक्तींशी संवाद साधा: अपेक्षांचे व्यवस्थापन करा आणि आवश्यक असल्यास अंतिम मुदतीवर वाटाघाटी करा.
- *सर्वाधिक परिणाम करणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित करा*: जास्तीत जास्त परिणाम घडवून आणणाऱ्या कामांना प्राधान्य द्या.तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर करा
- *पुन्हा पुन्हा करावी लागणारी कामे स्वयंचलित करा*: मॅन्युअल प्रयत्न आणि चुका कमी करण्यासाठी ऑटोमेशनचा वापर करा.
- *संघटित रहा*: कागदपत्रे आणि माहिती व्यवस्थित आणि सहज उपलब्ध ठेवा.
लक्ष केंद्रित ठेवा:- *विचलित करणाऱ्या गोष्टी कमी करा सोशल मीडिया, ईमेल आणि अनावश्यक बैठका मर्यादित ठेवा.
लक्ष केंद्रित करून काम करण्यासाठी वेळ निश्चित करा आणि व्यत्यय कमी करा.
शरीरात पाण्याची पातळी आणि ऊर्जा टिकवून ठेवा- लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी पाणी प्या आणि विश्रांती घ्या.
मी इथे हे मुद्दे मांडत आहे कारण ह्या महत्वाच्या काळात सर्वांनी योग्य तयारी ने मार्च महिन्यात काम केले तर धावपळ होणार नाही आणि, आपण बँकेच्या प्रगतीसाठी मोलाचा सहभाग देऊ शकतो व ह्या यशामध्ये आपलाही कर्मचारी म्हणून खारीचा पण मोलाचा वाटा देऊ यात.
सर्वांना माझ्यातर्फे ह्या आर्थिक क्षेत्रातल्या कुंभ मेळ्याच्या (31 मार्च वर्षअखेर) उत्सवाच्या )पुन्हा एकदा शुभेच्छा!
शिरीष शरद पाटील
व्यवसाय वृद्धी प्रशिक्षक आणि सल्लागार
पुणे
98903 33611
Tuesday, 3 February 2026
Announcement Handbook on managing Customers
I am happy to share I am creating a hand book for Professionals who are into service industry and dealing with the customers directly or through various modes of communication. In todays Era of AI, social media, digital age technology trying to overcome all work humans can do through so called “AI”, but one thing stands very true that, personalized advice can be given by “human beings” only who are keen to give you a sincere unbiased advise, based on your requirement and beneficial to you. In my career in Indian Finance & Insurance and service industry, spread over twenty years I had come across various products and services where in I found that the passionate Professional who thinks from the point of view of the end customer always and wins the Trust of the customer gets the deal conversion ,no matter the price or cost.
In my career of
more than two decade I got an
opportunity to work in two sectors namely Fast moving Consumer goods industry , and Insurance Industry ,
from frontline to manage a State and
Region. I am glad that , got an
opportunity to work with Respected Shri Harsh Mariwala Sir Who Built in Marico, & Shri Paresh Parasnis Sir at HDFC
standard Life, and many helpful senior leaders who have imbibed strong ethics and values
which have impacted my overall approach towards looking at work and challenges
and overcoming them. I am thankful to my leaders who have shown Trust and
helped him to be successful in my Sales career.
While I am working as Faculty & Trainer for Corporate Employees from BFSI,IT and Service sector, Coach and Sales Strategy Consultant ,where I found the team members our sales managers, FLS are confused on the direction or path of achieving their goals, don’t know how to do it; many Leaders are expecting Instant results ,and adopt Hire and Fire strategy but rarely guide or handhold how to get the work done. Many youngsters leave the Job or career due to lack of proper guidance and mentoring coaching. We have read the Rabbit and Tortoise Story, and it is still applicable in the current scenario where only short term results are seen at sacrifice on long term gain. My friends from Human resource would agree how to recruit and train an employee is a challenge and is universal problem as the Gen Z whom you cannot control ,unless deal smartly and win confidence of them.
I am scribbling my Journey of Sales Career, which
has helped many individuals to shape their professional
career and achieve Personal growth in their life.
I would
appreciate your sincere Suggestions ,inputss which can make this a useful guide
and Torch for the generations to come.
Shirish S. Patil
Sales Training Coach
Tuesday, 6 January 2026
नवीन वर्षाचे स्वागत आणि संकल्प! -ग्राहकाभिमुख सेवा
नवीन वर्षाचे स्वागत आणि संकल्प!
-ग्राहकाभिमुख सेवा
नमस्कार मित्रानो!
नवीन वर्षा मधे
सहर्ष स्वागत .-आपले परम कर्तव्य! ग्राहकाभिमुख सेवा.
आज स्पर्धेच्या युगात वावरताना आपण सर्वांनी आपल्या बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तत्पर राहणे ही काळाची गरज आहे. सहकारक्षेत्रातील आपल्या सारख्या बँका ह्या ग्राहकांच्या विश्वास आणि वर्षानुवर्षे जपलेले आपुलकीचे नाते ह्यामुळे टिकून आहे. त्यामुळे इतर कितीही पर्याय आले तरी सहकारी बँक आपले समाजामध्ये एक वेगळे स्थान टिकवून आहे.
काही महत्वाच्या गोष्टी आपण नेहमी लक्षात घेतल्या पाहिजेत. आज ऑनलाईन /डिजिटल क्रांतीमुळे युगामध्ये बँकेत येणारा ग्राहक खूप कमी झाला आहे, त्यामुळे ग्राहकांशी भेट प्रत्यक्ष कमी होते, पण जे थोडेफार येतात त्यांना आपण आपल्या उत्कृष्ट सेवा करून खुश करू शकतो, जेणेकरून त्यांना वारंवार बँकेत यावे वाटेल. येणाऱ्या प्रत्येकाचे स्मित हास्य करून स्वागत करावे.आपणहून काही मदत हवी आहे का विचारावे. ग्राहक हा आपला दैवत आहे, तो आहे म्हणून बँक आहे,हे नेहमी लक्षात ठेवावे. ग्राहकांशी बोलताना आपला आवाज बोलणे हा आदरपूर्वक, व योग्य आहे ना याचे भान ठेवावे.
बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करण्यासाठी काही टिप्स
संवाद कौशल्ये
ग्राहकांचे स्वागत :
ग्राहकांचे स्वागत स्मितहास्य आणि मैत्रीपूर्ण अभिवादन करावे. आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीस एक प्रकारचा विश्वास देते व सकारात्मक अनुभवाची खात्री देते.व ग्राहकाना आपल्याशी बोलण्यास प्रवृत्त
करते.
सक्रियपणे ऐका: ग्राहकांच्या प्रश्नांकडे आणि चिंतांकडे लक्ष द्या.त्यांचे म्हणणे प्रथम पूर्णपणे ऐकून घ्यावे.नंतर त्यांना स्पष्ट आणि संक्षिप्त पणे सोपी, समजण्यास सोपी उत्तरे द्या.सकारात्मक भाषा वापरा: सकारात्मक आणि उपयुक्त पद्धतीने प्रतिसाद द्यावा.
ग्राहक सेवा
वैयक्तिकृत सेवा :ग्राहकांना जाणून घ्या, ग्राहकांच्या खात्यांसह आणि प्राधान्यांशी स्वतःला परिचित करा.
शक्य असेल तर नाव लक्षात ठेवून ग्राहकांना नावाने संबोधित करा, वैयक्तिकृत अनुभव तयार करण्यासाठी ग्राहकांच्या नावांचा वापर करु शकतो,अर्थात त्याप्रमाणे तुमची मैत्रीपूर्ण ओळख निर्माण करावी . त्यांच्या बँकेकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी बोलून ग्राहकांच्या आर्थिक उद्दिष्टांमध्ये आणि गरजांमध्ये
रस दाखवावा.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कधी कधी एखादा ग्राहक काही कारणामुळे नाराज झाला तर चिडून बँकेत येतो, व राग अनावर झाल्यामुळे तावातावाने मोठ्याने बोलतो अशावेळी योग्य रीतीने त्याला हाताळणे फार महत्वाचे असते.
तक्रार हाताळणी करताना त्याला आपण सौम्य आणि शांत आवाजात बसण्यास सांगावे .त्याचे म्हणणे ऐका आणि सहानुभूती दाखवा आणि त्यांच्या भावना मान्य करा.झालेल्या कोणत्याही गैरसोयीबद्दल माफी मागा.मग सर्व समजावून घेतल्यावर समस्येचे ,तक्रारींचे त्वरित आणि कार्यक्षमतेने निराकरण करा.गरज असल्यास वरिष्ठांची मदत घ्यावी. आणि ग्राहकांचे पुर्ण समाधान झाल्याशिवाय त्याला जाऊ देऊ नये, आपल्या बँकेच्या प्रतिष्ठेसाठी संपूर्ण पण योग्य समर्पक उत्तर देणे आवश्यक असते.
ग्राहकांशी सुसंवाद आणि कर्मचारी वर्गाचे उत्पादनक्षमता वाढवी ह्यासाठी खास प्रशिक्षण वर्ग घेतले जातात, त्याचा मुख्यतः काउंटर वर ज्यांचा ग्राहकांशी नेहमी संबंध येतो अशा बऱ्याच कर्मचाऱ्यांचा फायदा होतो. इथे सर्व काही विस्तृत पणे मांडता येत नाही, त्यामुळे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एक दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आल्यास नक्कीच फायदा होतो.
चला
मग आपण एक संकल्प करूया ग्राहकाभिमुख सेवा करण्याचाआपल्यामध्ये वरील लेखाचा सकारात्मक बदल घडून यावा हीच अपेक्षा.
तुम्हा सर्वांना नविन वर्षाच्या 2026आणि शेवटच्या तिमाही आणि आर्थिक वर्ष 2025-2026 उद्दिष्ट माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा
शिरीष शरद पाटील.
प्रशिक्षण सल्लागार.पुणे
भ्रमणध्वनी-98903 33611