Monday, 21 December 2020

 Formation of team of Certified Financial Consultants. 

संघ बांधणी
माझी नियुक्ती जरी पुणे विभागात झाली असली तरी मला मुंबई ऑफिस ला रिपोर्ट करायचे होते, व त्यासाठी जानेवारी एकवीस तारखेला मुंबईला गेलो. एच आर डिपार्टमेंट मधे आवश्यक गोष्टींची पूर्तता करून मी वैभव काळे ना भेटलो. माझा विविध विभागातील लोकांचा परिचय कामाचे स्वरूप याची माहिती करून दिली . दुसर्‍या दिवशी वैभव आणि दिलीप दोघांनी कामाची व्याप्ती व त्यासाठी त्यांनी तयार केलेला मास्टर प्लॅन समजाऊन सांगितला . दोघांनी ही ग्रामीण भागात आपण कसे पोचणार आहोत याचा आराखडा तयार केला होता. पहिल्या वर्षी संपूर्ण भारतात फक्त पुणे, नागपूर ,नाशिक, पानिपत, अमरावती आणि विजय वाडा ब्रँच मधे ग्रामीण भागातील व्यवसायाची सुरुवात करणार होतो. कॉर्पोरेट ऑफिस मधील ट्रेनिंग झाल्यावर मला ठाणे शाखेत पाठवले तिथे मला काही विकास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात कामाचे स्वरुप agent'निवडीचे प्रक्रिया त्यासाठी लागणारी पात्रता कागदपत्रे यांची व्यवस्थित माहिती दिली. माझी काही agent बरोबर भेट ही झाली त्यातुन मला बरीच माहिती मिळाली. शेवटच्या दिवशी मी परत वांद्रे येथील मुख्य ऑफिस मधे गेलो, मी आणि वैभव काळे दोघांनी मिळून पुढील प्लान ठरवला हातामधे फक्त 58 दिवस होते ,त्याआधी agent's चि निवड irda शंभर तासाचे प्रशिक्षण ,परीक्षा आणि लायसन्स करून घेणे आणि मगच व्यवसाय सुरू करता येत होता . प्रत्येक दिवस हा महत्त्वाच्या होता .वेळ हातात कमी असल्यामुळे वृत्तपत्रामध्ये जाहिरात करण्याचे ठरविले. मराठीमधे जाहिरातीचा मजकुर आम्ही दोघांनी तयार केला व प्रसिद्धी विभागातील टीम कडे दिला .मी मुंबई वरुन निघण्याआधी पुण्याचे शाखा प्रमुख श्री सुदीप मित्रा यांच्याशी फोन वर ओळख करून दिली होती, त्यामुळे मी पुण्यातील शाखेत आल्यावर त्यांनी माझे हसत मुखाने स्वागत केले .माझे डायरेक्ट रिपोर्टींग पुण्यात नव्हते कारण आमचे ग्रामीण भागात काम असणार होते, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी मला एक स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून दिला व काहीही मदत लागल्यास नि संकोचपणे बोलण्यास सांगितले. ईतर पुण्यातील मॅनेजर सहकार्‍यांनी महेश, जीत राजीव ,थॉमस, व ईतर सर्व पण माझे हसत मुखाने स्वागत केले.
आधी ठरल्या प्रमाणे आमची जाहिरात मराठी वृत्तपत्रात झळकली, पुणे ब्रँच मधे 28 ते 29 तारखेला विमा सल्लागार नेमणुकी साठी थेट कागदपत्र घेऊन यायचे होते ,शाखेचा फोन आणि पत्ता,आणि पात्रता याविषयी सविस्तर माहिती आली होती. सकाळ पासुन च फोन सतत येत होता आणि मी त्यांना उत्तर देत होतो कमीत कमी शंभर सव्वाशे लोकानी फोन केले असतील, बाहेर स्वागत कक्षातील अविनाश नि पण खूप फोन घेऊन मला मदत केली .एकंदर परिस्थिती आणि प्रतिसाद पाहता सुदीप सरांशी बोलून शाखेच्या तिसर्‍या मजल्यावर एक मोठा प्रशिक्षण वर्ग होता तिथे आलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली . वैभव सर पण आदल्या दिवशीच पुण्यात आले होते ,आम्ही दोघे लवकरच ऑफिस मधे पोहोचलो. सकाळीच सव्वा नऊ पासुन च इच्छुक उमेदवार यायला सुरूवात झाली होती ,तेंव्हा वेळ न दवडता आम्ही मुलाखती घेण्यास सुरुवात केली. साधारण पाच सहा जणांना भेटल्यावर मला साधारण उमेदवारांची निवड कशी करायची याची कल्पना आली .तोवर बाहेर लोकांची गर्दी वाढत होती, तासाभरात पन्नास च्या वर लोक बाहेर आले होते काही अर्थातच पूर्ण जिल्हा मधून लांबून आले होते त्यामुळे त्यांना जास्त वेळ थांबवता येणार नव्हते मग मी आणि वैभव सरांनी एकत्र न घेता दोन कक्षात विभागून मुलाखती घेण्यास सुरुवात केली. आम्ही उमेदवार निवडीसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवली होती, व त्यानुसारच लोकांशी बोलत होतो व त्याप्रमाणे मुलाखती चालल्या पहिल्या दिवशी संध्याकाळी सात पर्यंत ! दुसर्‍या दिवशी वैभव काळे नागपूर ला गेले कारण तिथेही माझा सहकारी निखील अभ्यंकर त्याच्या संघ बांधणी साठी त्यांची वाट पहात होता. मग मी एकट्याने पुढे काम सुरू केले दुसर्‍या दिवशी ही खुप जण आले ,आणि मुख्यतः परगावाहून आलेले असल्यामुळे सर्वांना योग्य वेळ देणे खुप आवश्‍यक होते, दुपारी गर्दी वाढू लागल्यावर, मला सुदीप ने ब्रँच मधील मॅनेजर ना मुलाखतीसाठी मदत घेण्याचे सुचवले . सर्वानी सहकार्य केले .सर्व मिळून जवळ जवळ अर्धा सहस्र लोकांना आम्ही भेटलो होतो त्यातून आता संभाव्य उमेदवार निवडायचे होते .ग्रामीण भागात काम असणार होते त्याप्रमाणे मी तालुकावार विभागणी केली जेणेकरून पुणे जिल्ह्यात सर्व भागात आपल्याला प्रतिनिधी मिळतील. सर्व अर्जांची छाननी करून संभाव्य यादी तयार केली व त्याप्रमाणे त्यांना फोन करून कळवले . सगळ्यात जास्त आव्हान होते ते Irda ट्रेनिंग, कारण सर्वांना पुण्यामधे येऊन शंभर तासाचे क्लास रूम ट्रेनिंग घेणे अनिवार्य होते जे 13 दिवस होते, त्याप्रमाणे अंतिम यादी पराग पंडित ना मुंबईला पाठवली. एकुण साठ जणांची भली मोठी यादी होती. ही सर्व मंडळी पुण्यात येऊन आपापली राहण्याची व्यवस्था करणार होती ,बर्‍याच जणांना इच्छा असून जमले नाही कारण नातेवाईकांकडे आपण दोन दिवस चार दिवस राहू शकतो पण पंधरा दिवस राहणे अवघड असते. दुसरा मुख्य अडथळा म्हणजे नुसते ट्रेनिंग करून भागणार नव्हते तर नंतर त्यावर परीक्षा होती त्यातून पास झाले पाहिजे . ह्यामुळे सुद्धा काही मंडळीनी, नकार दिला. साहजिकच आहे कारण बर्‍याच जणांनी आता ह्या वयात कशाला कुठली परीक्षा द्यायची? तेरा दिवस हातातलं काम सोडुन रजा घ्यायची पुण्यामधे नातेवाईकांना त्रास देऊन मुक्काम करायचा आणि एवढे करूनही पास नाही झालो तर होणारी नाचक्की...ह्यामुळे असावे म्हणुन बरीच जण येतो सांगून ही ऐनवेळी आली नाहीत, तरीही चार फेब्रुवारी ला पहिली बॅच MIT कॉलेज च्या भव्यदिव्य अशा प्रांगणात सुरू झाली. काहीजण सासवड चाकण जेजुरी दौंड तळेगाव लोणावळा वरुन ये जा करणार होती त्यामुळे सर्वानी आमच्या ब्रँच जवळ यावे व तेथून बस ची सोय केली होती त्यामुळे सर्वाना सोयीचे झाले.
पहिल्या दिवशी स्वतः सुदीप मित्रा साहेबांनी येऊन प्रस्तावना करत सर्वांचे स्वागत केले व अभिनंदन करून सर्वानी विमा सल्लागार होण्याचा योग्य निर्णय घेतला आहे हे पटवून दिले त्यामुळे सगळ्याना प्रोत्साहन मिळाले . मलाही ह्या बॅच बरोबर राहून ट्रेनिंग घ्यायचे होते आणि परीक्षा उत्तीर्ण करायची होती ,कारण जर मला विमा क्षेत्रात काम करायचे असेल तर त्याची सखोल माहिती पाहिजेच असा आमच्या कंपनी चा दंडक होता.
Mit चा शैक्षणिक परिसर हा फारच विलोभनीय होता भव्य क्रीडांगण मोठा स्तूप असतो त्याप्रमाणे विशाल पोर्च आणि डोळ्याचे पारणे फेडणारी पहातच रहावे अशी मोठी माऊलींची ध्यानस्थ प्रसन्न मुर्ती होती . साहजिकच नतमस्तक झालो. क्लास रूम सुध्दा अद्ययावत होती हवेशीर मोकळी जागा मुबलक प्रकाश आणि शिकवण्यासाठी खास एलआयसी मध्ये काम केलेली अनुभवी जाणकार मंडळी, श्री पालव सर आणि श्री साठे ह्यांनी खुप छान प्रकारे आमचे ट्रेनिंग घेतले. ग्रामीण भागातील बॅच असल्यामुळे सोप्या मराठीत हसत खेळत आमचे तेरा दिवस ट्रेनिंग झाले व त्यावर असलेली परीक्षा निर्विघ्नपणे पार पडली .

परीक्षा सर्व जण पास झाले पण हातात लायसन्स येण्यासाठी वेळ लागला व तेरा मार्च ला माझी टीम अधिकृतपणे तयार झाली. त्यानंतर सर्वांना आमच्या कंपनी च्या products आणि Process च्या ट्रेनिंग चे आयोजन केले
वैभव सरांनी त्यासाठी खास विनंती ट्रेनिंग विभागातील Frederick सरांना केली त्यांनी मुंबई हुन खास येऊन दोन दिवस पुण्याला राहूनआम्हाला विविध प्रॉडक्ट शिकवले आणि कसे विकायचे याचे बारकावे समजाऊन सांगितले. युगंधरा ही त्यावेळेस सर्व फॉर्म्स प्रोसेसिंग पाहत असे, तिने सर्वांना अर्ज कसा भरावयाचा, कागदपत्रे काय काय लागतात याची माहिती करून दिली. सर्व जण दोन दिवसांत आवश्‍यक ती सगळी माहिती घेऊन आप आपल्या गावाकडे रवाना झाले.

आता सर्व सोपस्कार पार पडले होते,आणि आता खरे काम सुरू होणार होते .दुसर्‍या दिवशी वैभव सरांचा फोन आला त्यावेळी मला समजले की ज्यानी दोन दिवस पुण्याला येऊन ट्रेनिंग दिले ते Fredrick D'Souza सर ज्यावेळी पुण्याला आले होते त्यावेळी त्यांची आई मुंबईत दवाखान्यात आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट होती व ऑपरेशन होते पण काम सगळ्यात आधी म्हणुन त्यांनी घरातील इतर मंडळी वर ती जबाबदारी सोपवून फक्त आमच्या बॅच साठी पुण्याला आले होते. हे ऐकल्यावर मला धक्काच बसला. मी लगेच त्यांना फोन लावून त्यांची विचारपूस केली ,व मनोमन आभार मानले. देवाच्या कृपेने ऑपरेशन चांगले झाले व त्यांच्या आई सुखरुप घरी आल्या. 

अशा प्रकारे कामाच्या जबाबदारी साठी स्वतः च्या नात्यापेक्षाही काम महत्त्वाचे असते हे त्यांच्या कृती मधुन दिसून आले. अशा माणसांना देव कायम आव्हाने देऊन कसोटी घेतो व ते त्यात पूर्ण पणे यशस्वी होतात.अशा प्रकारे कामे करणारे वरीष्ठ पाहुन मला माझ्यावरील जबाबदारी ची जाणीव झाली.व कामाचा उत्साह आला.

माझ्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाच्या घटक जो माझी आयुष्यभर कायमस्वरूपी साथ करण्यास आला तो म्हणजे माझा मोबाईल माझ्याकडे आला तो कायमचे राहण्यासाठी .

ठरल्याप्रमाणे सर्वानी गेल्याबरोबर कामाला सुरुवात केली, त्यावेळी सर्वांकडे मोबाईल नव्हते ,आणि इनकमिंग सुध्दा पैसे लागत असत .सर्वजण मला मोबाईल वर रिंग करत, मग मी त्यांना ऑफिस मधून कॉल बॅक करत असे . संपूर्ण ब्रँच मध्ये माझ्या टेबल वर फक्त परगावी कॉल करण्यासाठी एसटीडी सुविधा होती , माझ्या सहकार्‍यांना त्याचा कधी कधी हेवा वाटायचा .
फॉर्म भरताना प्राथमिक माहिती डायरी मधे लिहून कागदपत्रे पडताळून माहिती चि खातरजमा करणे फॉर्म व्यवस्थित न चुकता भरणे वगैरे सर्वांना सांगितले. आर्थिक वर्ष संपवण्यासाठी हातामधे फक्त आठ दिवस राहिले,होते अशा स्थितीत जे काही तुम्ही आत्तापर्यंत शिकला आहात त्याच्या बळावर आपला व्यवसाय सुरू करून किमान आपला पहिला प्रपोजल फॉर्म दाखल करावा असे मी सर्वांना आवाहन केले. आणि माझ्या टीम ने मार्च अखेरीस आठ दिवसात चव्वेचाळीस प्रपोजल फॉर्म्स दाखल केली व सर्व पॉलिसी इश्यू पण झाल्या. सर्वात जास्त अकरा पॉलिसी टाकून प्रसन्न राज पंडय़ा जी टॉपर झाले.

माझी टीम वैशिष्ठ्य पूर्ण होती ह्यात शिक्षक, गृहिणी,बँक कर्मचारी, कर आणि वित्त सल्लागार, बांधकाम व्यावसायिक ,पोस्टल एजंट, वाहतूक क्षेत्रातील आणि शेतकरी आणि डॉक्टर ,सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी, सर्व दूर क्षे त्रात पोहोचण्यासाठी त्या समूहातील माणूस घेतला म्हणजे आपोआप आपल्याला त्या समूहातील लोक जोडले जातात ह्या उद्देशाने मी सर्व क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना संधी दिली आणि त्या सर्वानी माझा विश्वास सार्थ केला.

मित्रानो!!आयुर्विमा क्षेत्रात काहीही अनुभव नसताना मी माझी यशस्वी वाटचाल करू शकलो आज अठरा वर्षानी ह्या गोष्टी गम्मत शीर वाटतील पण जर सखोल विचार केला तर आज ही बर्‍याच जणांना त्याचा फायदा होत आहे ,आणि . म्हणुन मी सर्व सविस्तर जसे घडले तसेच मांडले आहे .लवकरच माझा "How to select an Insurance Advisor" हा YouTube व्हीडिओ प्रकाशित होत आहे जरूर बघा. आणि हा लेख कसा वाटला ते पण कळवा !!अभिप्राय जरूर कळवा

शिरीष शरद  पाटील 
 
Mbl:9890 333 611
Email: shirishp2211@gmail.com 
Tweet@shirishkeya
FB:#salestipsbyshirish
#sellingideasbyshirish

Monday, 14 December 2020

आयुर्विमा क्षेत्रात पदार्पण

 कालखंड तिसरा 

आयुर्विमा क्षेत्रात पदार्पण.
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे मी जानेवारी 2002 मधे आयुर्विमा क्षेत्रातील एचडीएफसी र्स्टँडर्ड लाइफ मध्ये नोकरी पत्करली.
मी त्यावेळी पुण्यामधे एका बंगलोर च्या प्रख्यात एफएमसीजी कंपनी मध्ये पुणे विभागाची सेल्स आणि मार्केटिंग विभागाची जबाबदारी सांभाळत होतो ज्यात पुणे ते नगर नांदेड असा मध्य महाराष्ट्र व मराठवाडा असा मोठा विभाग होता ,त्यामुळे साहजिकच व्यवसाय वृद्धी साठी प्रवास, घरापासून दूर राहावे लागत असे. माझा महाराष्ट्रात विशेषतः निमशहरी व ग्रामीण भागातील कार्यानुभव दांडगा होता ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मला गोष्ट पक्की जाणवली होती की ग्रामीण भागातील लोकांचा विश्‍वास मिळवणे हे खुप जिकरीचे काम असते पण तुम्ही जर लोकांचा विश्‍वास संपादन केला तर मग तुम्ही त्यांचे घरच्या कुटुंबाप्रमाणे एक सदस्य होतात व ते डोळे मिटून तुमच्यावर प्रेम करतात विश्‍वास ठेवतात. एक प्रकारचे उत्तम नाते निर्माण होते ,ते कायमचे तुमचे होतात मग दुसरे कुणी कितीही मोठे आमिष दाखवले तरी ते तुमची साथ सोडत नाहीत . मी ज्या बंगळुरू च्या डेअरी प्रॉडक्ट कंपनी मधे होतो त्यांनी महाराष्ट्रात नुकताच विस्तार करण्यास सुरुवात केली होती मी गेली अनेक वर्षापासुन महाराष्ट्रातील एफ एम सी जी मधे असल्यामुळे माझ्या अनुभव व जनसंपर्काचा त्यांचा बाजारपेठेत वितरण वाढविण्यासाठी चांगला उपयोग होत होता .दरवर्षी बाजारपेठ व व्यवसाय वाढत होता, पण सर्वदूर पोहोचवण्यासाठी नविन बाजारपेठा शोधुन तेथे आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मी जात होतो त्यामुळे साहजिकच प्रवास व दौऱ्यामुळे घरापासून दूर राहावे लागत होते.
आम्ही कोल्हापुरात रहात असताना माझ्या वडीलांना कंपवात म्हणजे (Parkinson) झाला ,असा आजार कुणालाही न होवो ,उपचार सुरू होते पण चालताना तोल जाणे , वाढत होते, त्यामुळे कायम त्यांच्या वर लक्ष ठेवावे लागत असे. माझी फिरती चि नोकरी असल्याने हवे तसे मला नानांकडे लक्ष देता येत नव्हते .

त्या सुमारास 2001 साली विमा व्यवसायाची खाजगी कंपन्यांना व्यवसायाची परवानगी मिळाली होती. व नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या . खाजगीकरण करताना विमा नियामक प्राधिकरण (irda )ने केलेल्या नियमावलीनुसार सर्व नवीन कंपनीला दर वर्षी संपुर्ण व्यवसायाच्या पैकी काही व्यवसाय हा ग्रामीण व सामाजिक भागातून करण्याची अट पण होती ., आणि हेच माझ्यासाठी फायद्याचे ठरले, एच डी एफ सी स्टँडर्ड लाईफ पुणे शाखा सुरू झाली होती. शहरातील विक्री अधिकारी नेमले गेले होते, कंपनीचा त्यांचा ग्रामीण भागात काम करण्यासाठी योग्य व्यक्ति चा शोध सुरू होता मला काही मित्रांकडून अशी माहिती मिळाली ,मी त्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले आणि माहिती घेऊन ई-मेल वर माझा अर्ज पाठवला. त्यावेळी मोबाईल माझ्याकडे नव्हता, घरचा नंबर दिला होता मला एक दिवस मुंबई होऊन फोन आला मी काळे बोलतोय तुमचा मेल मिळाला आहे, व मुलाखतीसाठी मुंबईला यावे लागेल असे सांगितले. व तीन जानेवारीला मला मुलाखतीसाठी मुंबईत बोलावले .त्यावेळी कंपनीचे कार्यालय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे होते. मी रामप्रहरी लवकर उठून बस पकडली . मुंबईत अर्धे आयुष्य गेले असल्याने मुंबई चि माहिती होती,त्यावेळी मुंबईला ट्राफिक मुळे चार साडे चार तास कमीत कमी लागायचे. मी साधारण अकराच्या सुमारास पोहोचलो. बिल्डिंग ची सुरक्षा फार कडक होती. मी फक्त मुलाखतीसाठी आलेला उमेदवार आहे, माझ्या कडील बॅगमधे फक्त कागद पत्रांची फाईल आहे, व मी कुठला अतिरेकी किंवा संशयित,देशद्रोही कारवाई करणाऱ्या पैकी नाही , माझ्या कडून कुठलाही धोका नाही ,अशी खात्री त्यांनी करून घेतली असावी, व सर्व खात्री पटल्यावर सुरक्षा रक्षकांनी गळ्यात बांधण्या साठी इंग्रजी वि (v)अक्षर म्हणजेच व्हिजिटर् असे लिहिलेले कार्ड शर्ट वर लावायला दिले. सुरक्षा रक्षक मराठी दिसत होते होते म्हणुन मी मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी हिन्दीत संभाषण केले बहुधा एकंदर तिथे मराठी कमी येत असावेत माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता हातानेच लिफ्ट कडे जाण्याची खूण केली. मुंबईत आडनावावरून माणसे ओळखता येत नाहीत, कारण ईथे भारतातुन सर्व राज्यामधील मंडळी आली आहेत. उदाहरणच द्यावयाचे झाले तर यादव , चव्हाण व्यास ,महाजन , जोशी खरे ,ही आडनावे संभ्रमात टाकणारी आहेत, महाराष्ट्रात ,गुजरात व वरती उत्तर भारतात पण असतात , पण मातृभाषा भिन्न असते ,त्यामुळे माझा अंदाज चुकला. एकंदर तिथला माहोल, भव्यदिव्य गोलाकार बिल्डिंग ,प्रवेश कक्ष एवढा मोठा, हॉल मी पहिल्यांदाच ,पाहत होतो आम्ही 1994 साली मुंबई सोडली होती सात आठ वर्षात मुम्बई खूप बदललेली जाणवली. सर्वत्र काचेच्या उंच भिंती पाहून, आणि तो बिल्डिंग च्या मध्यभागी असलेला उंच गोलाकार घुमट (Dome) पाहून हरखून गेलो.,लहानपणी गोष्टीतला प्रसंग होता त्याप्रमाणे जर मान वर करून पाहिले तर डोक्यावरची टोपी खाली सहज पडलीच असती, असा विचार येऊन गेला. तिथे चार लिफ्ट होत्या,एक लिफ्ट आली पण कुणीच नव्हते. त्यामुळे उगीच टंगळ मंगळ करत थांबलो,उगाच एकटा जाऊन अडकू अशी मनातली भाबडी भीती, मग काही जण आले मग मी उगाच hdfc कितवा मजला असे विचारत त्यांच्याबरोबर लिफ्ट मधे शिरलो.
माझी पहिली प्राथमिक मुलाखत मनुष्य बळ विकास विभागातील अधिकाऱ्यांनी घेतली, व मला पुढील मुलाखतीसाठी स्वागत कक्षात थांबायला सांगितले .पहिला राउंड तर चांगला झाला होता, मी उगीच काहीतरी करायचे म्हणुन पेपर वाचत बसलो होतो, तिथे श्री. वैभव काळे आले व त्यांनी शुद्ध मराठी मध्ये बोलायला सुरुवात केली, तोपर्यंत साडेबारा वाजत आले होते, त्यांनी मला तु पुण्यावरून सकाळीच निघून आला आहेस तेव्हा आपण पहिले जेवण करू आणि मग बोलू, असे सांगितले मला थोडे संकोच ल्या सारखे झाले बर उपवास आहे म्हणायचे तर नेमका बुधवार !!!! मग नको नको म्हणत त्यांच्याबरोबर कॅफेटेरिया मधे गेलो . त्यांनी मी दत्तात्रय काळे आणि माझे टोपण नाव वैभव आहे असे सांगितले, व जेवताना पुणे शहर, चितळे ची बाकरवडी, अमृततुल्य चहा दगडूशेठ गणपती अशा अवांतर गप्पा मारत त्यांनी माझ्यावरील दडपण हलके केले. मुलाखतीसाठी गेल्यावर अशा प्रकारे कुणी तुम्हाला वागणूक मिळावी हा एक आगळाच अनुभव होता. मग आम्ही एका मीटिंग रूम मधे गेलो, जवळजवळ एक तास माझी प्रदीर्घ मुलाखत झाली. त्यानंतर त्यांनी मला तुझा आता हेड रिटेल सेल्स श्री. दिलीप सरांकडे पुढच्या फायनल राऊंड आहे व त्या साठी स्वागत कक्षात थांबायला सांगितले.

मी मेजावर असलेली मॅगझिन्स चालत बसलो होतो, आणि अचानक जोरजोरात सगळीकडे अलार्म वाजू लागले, धावपळ सुरू झाली, लगेच ह्या जिन्याने सर्व जण खाली चला अशा सूचना काही सुरक्षारक्षकांनी दिल्या, व सर्व जण खाली जाऊ लागले मला काय करावे ते सुचेना ,पण लगेच श्री दिलीप सर आले व त्यांनी मला घाबरू नकोस आपल्याला खाली जायचे आहे असे सांगितले. दहा मिनिटात सर्व जण बिल्डिंग खाली जमा झाले. मग लगेच फायर ब्रिगेड मधील काही जवान व अधिकारी आम्हाला संबोधण्यास साठी हातात माईक घेऊन समोर उभे राहिले. त्यांनी शांतपणे बोलायला सुरुवात केली तोवर बर्‍याच जणांनी आपल्याला देवाचा धावा सुरू केलाही होता, त्यांनी घाबरू नका ही एक फायर मॉक ड्रिल होती , जर कधी आग लागली तर स्वतः चि सुरक्षा कशी करायची अग्निशामक सिलिंडर कसा वापरायचा वगैरे प्रात्यक्षिक करून दाखवले. सगळ्यानी सुटकेचा निश्वास सोडला. काही जणांनी आधी का नाही सांगितले अशी दबक्या आवाजात कुजबुज केली. मग सर्व जण परत आपल्या जागेवर जाऊन बसले. ह्या सगळ्या गोंधळात साडेचार वाजले. मग श्री दिलीप गजा राव सरांनी माझा मुलाखतीचा फायनल राऊंड घेतला. ग्रामीण भागातील जबाबदारी, चॅलेंज आणि कंपनी चा व्यवसाय उद्देश सांगितला. त्यांच्या अपेक्षा,उद्देश व माझा अनुभव, पात्रता बर्‍यापैकी पैकी जुळत होते असे मला जाणवले. सर्व सोपस्कार पार पडले नियुक्ती जवळ जवळ निश्चित झाली होती , पण लवकरच तुम्हाला कळवतो असे सांगितले . रात्री उशीरा घरी पुण्याला पोहोचलो.
दोन दिवसांनी घरी फोन आला व माझी निवड झाल्याचे समजले ,लगेच रुजू व्हा असे सांगितले. माझा आनंद हा की एका नविन क्षेत्रात मला संधी मिळाली होती व फक्त पुणे ग्रामीण भागात काम असणार होते त्यामुळे रोज रात्री काही का होईना घरी रहायला मिळणार होते, परगावी मुक्काम दौरे टळणार होता त्यामुळे साहजिकच मला माझ्या वडिलांकडे लक्ष देता येणार होते ,त्यावेळी नानांनी कंपवात झाल्यामुळे अंथरूण धरले होते ,आई आणि मी त्यांची शक्य तेवढी काळजी घेत होतो . घरातील सर्वांना आनंद झाला .मी वैभव सरांकडून पंधरा दिवसांची मुदत मागून घेतली कारण पहिल्या कंपनी मधून लगेच जबाबदारी सोडून निघता येणार नव्हते ,तशी मी माझे एरिया मॅनेजर श्री विनय काणे यांना कल्पना दिली ,व त्यांनी माझी प्रगती होत आहे हे पाहून मोठ्या मनाने जाण्यास परवानगी दिली. मी ही त्यांची ऐनवेळी माझ्या जाण्यामुळे पंचाईत होऊ नये म्हणुन माझ्या दोन मित्रांना त्याच्याकडे माझी जागा घेण्यासाठी पाठवले.
पुढच्या आठ दिवसात मी माझ्या सर्व टीम मधील सहकारी वितरक यांची प्रत्यक्ष, भेट घेऊन त्यांचा निरोप घेतला, मराठवाडा विभागातील टीम चीऔरंगाबाद ला मीटिंग घेऊन त्यांचा निरोप घेतला. निरोप घेताना सगळे जण भावनावश झाले होते , असे म्हणतात की माणसाचे डोळे आणि चेहरा हा माणसाचा आरसा असतो व तो बोलतो असे म्हणतात, याचा अनुभव येत होता बरेच काही न बोलता सगळ्यांचे डोळे आणि चेहरा बरेच काही सांगत होते. ज्या एफमसीजी (Fmcg) इंडस्ट्री मध्ये मी गेले अकरा वर्षापासुन विक्री प्रतिनिधी ते रीजनल हेड पदावर स्वतः च्या मेहनती ने पोहोचलो होतो , खूप जीवापाड प्रेम करणारी माणसे जोडली गेली, माझ्या एका फोन वर शब्दाला मान देऊन टार्गेट पूर्ण करण्यासाठी मदत करणारे वितरक, सेल्स ऑफिसर , असे अनेक एक मोठा परिवार, सोडुन मी एका नवीन क्षेत्रात चाललो होतो माझे तसेही वार्षिक टार्गेट आधीच पूर्ण झाले होते मी टार्गेट च्या 120 टक्के अधिक करून पूर्ण भारतात दुसर्‍या क्रमांकावर होतो पण जाण्यापूर्वी ,ह्या महिन्याचे ठरवलेल्या फिगर्स करण्याचे ठरविले, योगायोगाने कंपनीने वितरक व सेल्स मॅनेजर साठी आकर्षक टार्गेट स्कीम घोषित केली होती,मी माझ्या टीम सहकार्‍यांना वितरकांना विश्वासात घेतले आणि मी जाण्याआधी माझ्यासाठी टार्गेट पूर्ण करण्याचे आव्हान केले ,त्यामागे त्यांचा व्यवसाय वाढ व आर्थिक फायदा होताच,सर्वानी सहकार्य केले आणि त्याचे फलित म्हणजे मी शेवटच्या दहा दिवसांआधी च माझ्या विभागाचे टार्गेट पुर्ण केले व आनंदाने सगळ्याचा निरोप घेतला , तो एकमेकांच्या संपर्कात कायम राहण्याचे आश्वासन घेऊनच.
रक्ताच्या नात्यापेक्षाही काही नाती खूप घट्ट असतात व उपयोगी पडतात ह्याचा मला पुन्हा प्रत्यय आला .
अजून बरेच लिहायचे आहे ,अभिप्राय मिळाला तर आनंद होईल.
शिरीष शरद पाटील
WA:9890 333 611 
M:shirishp2211@gmail.com 
Twi:@shirishkeya
FB:#salestipsbyshirish
#sellingideasbyshirish