कालखंड तिसरा
आयुर्विमा क्षेत्रात पदार्पण.माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे मी जानेवारी 2002 मधे आयुर्विमा क्षेत्रातील एचडीएफसी र्स्टँडर्ड लाइफ मध्ये नोकरी पत्करली.
मी त्यावेळी पुण्यामधे एका बंगलोर च्या प्रख्यात एफएमसीजी कंपनी मध्ये पुणे विभागाची सेल्स आणि मार्केटिंग विभागाची जबाबदारी सांभाळत होतो ज्यात पुणे ते नगर नांदेड असा मध्य महाराष्ट्र व मराठवाडा असा मोठा विभाग होता ,त्यामुळे साहजिकच व्यवसाय वृद्धी साठी प्रवास, घरापासून दूर राहावे लागत असे. माझा महाराष्ट्रात विशेषतः निमशहरी व ग्रामीण भागातील कार्यानुभव दांडगा होता ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मला गोष्ट पक्की जाणवली होती की ग्रामीण भागातील लोकांचा विश्वास मिळवणे हे खुप जिकरीचे काम असते पण तुम्ही जर लोकांचा विश्वास संपादन केला तर मग तुम्ही त्यांचे घरच्या कुटुंबाप्रमाणे एक सदस्य होतात व ते डोळे मिटून तुमच्यावर प्रेम करतात विश्वास ठेवतात. एक प्रकारचे उत्तम नाते निर्माण होते ,ते कायमचे तुमचे होतात मग दुसरे कुणी कितीही मोठे आमिष दाखवले तरी ते तुमची साथ सोडत नाहीत . मी ज्या बंगळुरू च्या डेअरी प्रॉडक्ट कंपनी मधे होतो त्यांनी महाराष्ट्रात नुकताच विस्तार करण्यास सुरुवात केली होती मी गेली अनेक वर्षापासुन महाराष्ट्रातील एफ एम सी जी मधे असल्यामुळे माझ्या अनुभव व जनसंपर्काचा त्यांचा बाजारपेठेत वितरण वाढविण्यासाठी चांगला उपयोग होत होता .दरवर्षी बाजारपेठ व व्यवसाय वाढत होता, पण सर्वदूर पोहोचवण्यासाठी नविन बाजारपेठा शोधुन तेथे आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मी जात होतो त्यामुळे साहजिकच प्रवास व दौऱ्यामुळे घरापासून दूर राहावे लागत होते.
आम्ही कोल्हापुरात रहात असताना माझ्या वडीलांना कंपवात म्हणजे (Parkinson) झाला ,असा आजार कुणालाही न होवो ,उपचार सुरू होते पण चालताना तोल जाणे , वाढत होते, त्यामुळे कायम त्यांच्या वर लक्ष ठेवावे लागत असे. माझी फिरती चि नोकरी असल्याने हवे तसे मला नानांकडे लक्ष देता येत नव्हते .
त्या सुमारास 2001 साली विमा व्यवसायाची खाजगी कंपन्यांना व्यवसायाची परवानगी मिळाली होती. व नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या . खाजगीकरण करताना विमा नियामक प्राधिकरण (irda )ने केलेल्या नियमावलीनुसार सर्व नवीन कंपनीला दर वर्षी संपुर्ण व्यवसायाच्या पैकी काही व्यवसाय हा ग्रामीण व सामाजिक भागातून करण्याची अट पण होती ., आणि हेच माझ्यासाठी फायद्याचे ठरले, एच डी एफ सी स्टँडर्ड लाईफ पुणे शाखा सुरू झाली होती. शहरातील विक्री अधिकारी नेमले गेले होते, कंपनीचा त्यांचा ग्रामीण भागात काम करण्यासाठी योग्य व्यक्ति चा शोध सुरू होता मला काही मित्रांकडून अशी माहिती मिळाली ,मी त्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले आणि माहिती घेऊन ई-मेल वर माझा अर्ज पाठवला. त्यावेळी मोबाईल माझ्याकडे नव्हता, घरचा नंबर दिला होता मला एक दिवस मुंबई होऊन फोन आला मी काळे बोलतोय तुमचा मेल मिळाला आहे, व मुलाखतीसाठी मुंबईला यावे लागेल असे सांगितले. व तीन जानेवारीला मला मुलाखतीसाठी मुंबईत बोलावले .त्यावेळी कंपनीचे कार्यालय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे होते. मी रामप्रहरी लवकर उठून बस पकडली . मुंबईत अर्धे आयुष्य गेले असल्याने मुंबई चि माहिती होती,त्यावेळी मुंबईला ट्राफिक मुळे चार साडे चार तास कमीत कमी लागायचे. मी साधारण अकराच्या सुमारास पोहोचलो. बिल्डिंग ची सुरक्षा फार कडक होती. मी फक्त मुलाखतीसाठी आलेला उमेदवार आहे, माझ्या कडील बॅगमधे फक्त कागद पत्रांची फाईल आहे, व मी कुठला अतिरेकी किंवा संशयित,देशद्रोही कारवाई करणाऱ्या पैकी नाही , माझ्या कडून कुठलाही धोका नाही ,अशी खात्री त्यांनी करून घेतली असावी, व सर्व खात्री पटल्यावर सुरक्षा रक्षकांनी गळ्यात बांधण्या साठी इंग्रजी वि (v)अक्षर म्हणजेच व्हिजिटर् असे लिहिलेले कार्ड शर्ट वर लावायला दिले. सुरक्षा रक्षक मराठी दिसत होते होते म्हणुन मी मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी हिन्दीत संभाषण केले बहुधा एकंदर तिथे मराठी कमी येत असावेत माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता हातानेच लिफ्ट कडे जाण्याची खूण केली. मुंबईत आडनावावरून माणसे ओळखता येत नाहीत, कारण ईथे भारतातुन सर्व राज्यामधील मंडळी आली आहेत. उदाहरणच द्यावयाचे झाले तर यादव , चव्हाण व्यास ,महाजन , जोशी खरे ,ही आडनावे संभ्रमात टाकणारी आहेत, महाराष्ट्रात ,गुजरात व वरती उत्तर भारतात पण असतात , पण मातृभाषा भिन्न असते ,त्यामुळे माझा अंदाज चुकला. एकंदर तिथला माहोल, भव्यदिव्य गोलाकार बिल्डिंग ,प्रवेश कक्ष एवढा मोठा, हॉल मी पहिल्यांदाच ,पाहत होतो आम्ही 1994 साली मुंबई सोडली होती सात आठ वर्षात मुम्बई खूप बदललेली जाणवली. सर्वत्र काचेच्या उंच भिंती पाहून, आणि तो बिल्डिंग च्या मध्यभागी असलेला उंच गोलाकार घुमट (Dome) पाहून हरखून गेलो.,लहानपणी गोष्टीतला प्रसंग होता त्याप्रमाणे जर मान वर करून पाहिले तर डोक्यावरची टोपी खाली सहज पडलीच असती, असा विचार येऊन गेला. तिथे चार लिफ्ट होत्या,एक लिफ्ट आली पण कुणीच नव्हते. त्यामुळे उगीच टंगळ मंगळ करत थांबलो,उगाच एकटा जाऊन अडकू अशी मनातली भाबडी भीती, मग काही जण आले मग मी उगाच hdfc कितवा मजला असे विचारत त्यांच्याबरोबर लिफ्ट मधे शिरलो.
माझी पहिली प्राथमिक मुलाखत मनुष्य बळ विकास विभागातील अधिकाऱ्यांनी घेतली, व मला पुढील मुलाखतीसाठी स्वागत कक्षात थांबायला सांगितले .पहिला राउंड तर चांगला झाला होता, मी उगीच काहीतरी करायचे म्हणुन पेपर वाचत बसलो होतो, तिथे श्री. वैभव काळे आले व त्यांनी शुद्ध मराठी मध्ये बोलायला सुरुवात केली, तोपर्यंत साडेबारा वाजत आले होते, त्यांनी मला तु पुण्यावरून सकाळीच निघून आला आहेस तेव्हा आपण पहिले जेवण करू आणि मग बोलू, असे सांगितले मला थोडे संकोच ल्या सारखे झाले बर उपवास आहे म्हणायचे तर नेमका बुधवार !!!! मग नको नको म्हणत त्यांच्याबरोबर कॅफेटेरिया मधे गेलो . त्यांनी मी दत्तात्रय काळे आणि माझे टोपण नाव वैभव आहे असे सांगितले, व जेवताना पुणे शहर, चितळे ची बाकरवडी, अमृततुल्य चहा दगडूशेठ गणपती अशा अवांतर गप्पा मारत त्यांनी माझ्यावरील दडपण हलके केले. मुलाखतीसाठी गेल्यावर अशा प्रकारे कुणी तुम्हाला वागणूक मिळावी हा एक आगळाच अनुभव होता. मग आम्ही एका मीटिंग रूम मधे गेलो, जवळजवळ एक तास माझी प्रदीर्घ मुलाखत झाली. त्यानंतर त्यांनी मला तुझा आता हेड रिटेल सेल्स श्री. दिलीप सरांकडे पुढच्या फायनल राऊंड आहे व त्या साठी स्वागत कक्षात थांबायला सांगितले.
मी मेजावर असलेली मॅगझिन्स चालत बसलो होतो, आणि अचानक जोरजोरात सगळीकडे अलार्म वाजू लागले, धावपळ सुरू झाली, लगेच ह्या जिन्याने सर्व जण खाली चला अशा सूचना काही सुरक्षारक्षकांनी दिल्या, व सर्व जण खाली जाऊ लागले मला काय करावे ते सुचेना ,पण लगेच श्री दिलीप सर आले व त्यांनी मला घाबरू नकोस आपल्याला खाली जायचे आहे असे सांगितले. दहा मिनिटात सर्व जण बिल्डिंग खाली जमा झाले. मग लगेच फायर ब्रिगेड मधील काही जवान व अधिकारी आम्हाला संबोधण्यास साठी हातात माईक घेऊन समोर उभे राहिले. त्यांनी शांतपणे बोलायला सुरुवात केली तोवर बर्याच जणांनी आपल्याला देवाचा धावा सुरू केलाही होता, त्यांनी घाबरू नका ही एक फायर मॉक ड्रिल होती , जर कधी आग लागली तर स्वतः चि सुरक्षा कशी करायची अग्निशामक सिलिंडर कसा वापरायचा वगैरे प्रात्यक्षिक करून दाखवले. सगळ्यानी सुटकेचा निश्वास सोडला. काही जणांनी आधी का नाही सांगितले अशी दबक्या आवाजात कुजबुज केली. मग सर्व जण परत आपल्या जागेवर जाऊन बसले. ह्या सगळ्या गोंधळात साडेचार वाजले. मग श्री दिलीप गजा राव सरांनी माझा मुलाखतीचा फायनल राऊंड घेतला. ग्रामीण भागातील जबाबदारी, चॅलेंज आणि कंपनी चा व्यवसाय उद्देश सांगितला. त्यांच्या अपेक्षा,उद्देश व माझा अनुभव, पात्रता बर्यापैकी पैकी जुळत होते असे मला जाणवले. सर्व सोपस्कार पार पडले नियुक्ती जवळ जवळ निश्चित झाली होती , पण लवकरच तुम्हाला कळवतो असे सांगितले . रात्री उशीरा घरी पुण्याला पोहोचलो.
दोन दिवसांनी घरी फोन आला व माझी निवड झाल्याचे समजले ,लगेच रुजू व्हा असे सांगितले. माझा आनंद हा की एका नविन क्षेत्रात मला संधी मिळाली होती व फक्त पुणे ग्रामीण भागात काम असणार होते त्यामुळे रोज रात्री काही का होईना घरी रहायला मिळणार होते, परगावी मुक्काम दौरे टळणार होता त्यामुळे साहजिकच मला माझ्या वडिलांकडे लक्ष देता येणार होते ,त्यावेळी नानांनी कंपवात झाल्यामुळे अंथरूण धरले होते ,आई आणि मी त्यांची शक्य तेवढी काळजी घेत होतो . घरातील सर्वांना आनंद झाला .मी वैभव सरांकडून पंधरा दिवसांची मुदत मागून घेतली कारण पहिल्या कंपनी मधून लगेच जबाबदारी सोडून निघता येणार नव्हते ,तशी मी माझे एरिया मॅनेजर श्री विनय काणे यांना कल्पना दिली ,व त्यांनी माझी प्रगती होत आहे हे पाहून मोठ्या मनाने जाण्यास परवानगी दिली. मी ही त्यांची ऐनवेळी माझ्या जाण्यामुळे पंचाईत होऊ नये म्हणुन माझ्या दोन मित्रांना त्याच्याकडे माझी जागा घेण्यासाठी पाठवले.
पुढच्या आठ दिवसात मी माझ्या सर्व टीम मधील सहकारी वितरक यांची प्रत्यक्ष, भेट घेऊन त्यांचा निरोप घेतला, मराठवाडा विभागातील टीम चीऔरंगाबाद ला मीटिंग घेऊन त्यांचा निरोप घेतला. निरोप घेताना सगळे जण भावनावश झाले होते , असे म्हणतात की माणसाचे डोळे आणि चेहरा हा माणसाचा आरसा असतो व तो बोलतो असे म्हणतात, याचा अनुभव येत होता बरेच काही न बोलता सगळ्यांचे डोळे आणि चेहरा बरेच काही सांगत होते. ज्या एफमसीजी (Fmcg) इंडस्ट्री मध्ये मी गेले अकरा वर्षापासुन विक्री प्रतिनिधी ते रीजनल हेड पदावर स्वतः च्या मेहनती ने पोहोचलो होतो , खूप जीवापाड प्रेम करणारी माणसे जोडली गेली, माझ्या एका फोन वर शब्दाला मान देऊन टार्गेट पूर्ण करण्यासाठी मदत करणारे वितरक, सेल्स ऑफिसर , असे अनेक एक मोठा परिवार, सोडुन मी एका नवीन क्षेत्रात चाललो होतो माझे तसेही वार्षिक टार्गेट आधीच पूर्ण झाले होते मी टार्गेट च्या 120 टक्के अधिक करून पूर्ण भारतात दुसर्या क्रमांकावर होतो पण जाण्यापूर्वी ,ह्या महिन्याचे ठरवलेल्या फिगर्स करण्याचे ठरविले, योगायोगाने कंपनीने वितरक व सेल्स मॅनेजर साठी आकर्षक टार्गेट स्कीम घोषित केली होती,मी माझ्या टीम सहकार्यांना वितरकांना विश्वासात घेतले आणि मी जाण्याआधी माझ्यासाठी टार्गेट पूर्ण करण्याचे आव्हान केले ,त्यामागे त्यांचा व्यवसाय वाढ व आर्थिक फायदा होताच,सर्वानी सहकार्य केले आणि त्याचे फलित म्हणजे मी शेवटच्या दहा दिवसांआधी च माझ्या विभागाचे टार्गेट पुर्ण केले व आनंदाने सगळ्याचा निरोप घेतला , तो एकमेकांच्या संपर्कात कायम राहण्याचे आश्वासन घेऊनच.
रक्ताच्या नात्यापेक्षाही काही नाती खूप घट्ट असतात व उपयोगी पडतात ह्याचा मला पुन्हा प्रत्यय आला .
अजून बरेच लिहायचे आहे ,अभिप्राय मिळाला तर आनंद होईल.
शिरीष शरद पाटील
WA:9890 333 611
M:shirishp2211@gmail.com
Twi:@shirishkeya
FB:#salestipsbyshirish
#sellingideasbyshirish
Next Blog on building Team of Rural Cfcs
ReplyDeleteExcellent thoughts.
ReplyDeleteThanks Miteshbhai
ReplyDelete