नमस्कार
खूप दिवसांपासुन मनामधे एक गोष्ट पक्की केली होती ती म्हणजे मला माझ्या प्रोफेशनल जीवनामध्ये आलेले चांगले वाईट अनुभव शब्दात लिहुन काढणे, आत्मचरित्र वगैरे लिहिण्यासाठी मी काही खुप मोठी असामी नाही पण एक सामान्य नागरिक आहे, लॉक डाऊन सु रु झाल्यावर सगळ्यानाच सारखाच हुरूप आला होता बरेच काही नवनवीन करण्याचा , पण सुरुवात काही झाली नाही ,कारण घरात जरी होतो तरी मुहूर्त काही लागला नाही. मागच्या महिन्यात श्री. निलेश साठे सरांचे "साठे उत्तरांची कहाणी "हे पुस्तक मला मिळाले,तशी माझी सरांची ओळख नाही परंतु दोघेही एका क्षेत्रातील ते म्हणजे आयुर्विमा, गेल्या काही वर्षापासुन सोशल नेटवर्किंग साईटवर मी सरांचे लेख वाचत होतो,दूरदर्शन वर मुलाखत पाहिली होती, व ते एलआयसी मधील खूप वरीष्ठ पदावरील अधिकारी ,असल्यामुळे बरेच ऐकले होते, त्यामुळे सरांची तशी "थेट नाही पण नेट " ओळख झाली होती ,मग त्यांच्या पुस्तकाविषयी माहिती मिळाली पण मला लॉक डाऊन मध्ये बाजारात जाऊन पुस्तक आणणे शक्य नव्हते, असे मी सरांना सांगितले त्यांनी लगेच पत्ता पाठवा मी पाठवण्याची व्यवस्था करतो असे सांगितले, तीन दिवसांनी घराची बेल वाजली,दारात पोस्टमन काका उभे, मला वाटले ते दिवाळी मागायला आले असावेत कारण त्यांची भेट फक्त दिवाळी ते दिवाळीलाच होते ,पण दिवाळीला अजूनही पंधरा दिवस होते, त्यांनी एक छान नमस्कार अदबीने केला ,शक्य तेवढे स्मित हास्य केले व माझ्या मनातली शंका दूर केली, पाटीलसाहेब नागपूरहून रजिस्टर पोस्टाने पार्सल आहे ,हा घ्या पेन आणि सही करून ताब्यात घ्या ,व माझ्या तब्येतीची विचारपूस केली., दिवाळीत येतो परत असे आवर्जून सांगितले !!!!...तेंव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की ,ह्यावर्षी चांगली दिवाळी मिळावी ह्यासाठी पूर्वतयारी..सूचना, व हास्य अदबीनं वागणे हे सरकारी नोकरीत जरी वर्ज्य असावे(माझा समज आहे)तरी चांगली पोस्ट (दिवाळी ) मिळावी म्हणुन केलेली गुंतवणूक असावी . पार्सल उघडले तर मला आश्चर्याचा धक्का जे पुस्तक वाचण्याची मी इच्छा व्यक्त केली होती त्याची चक्क नवी कोरी प्रत माझ्या हातात!!! माझा विश्वासच बसत नव्हता, कारण माझ्या एका छोट्या सूचनेवरून सरांनी मला पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली. मी लगेच धन्यवाद मानले ,सरांनी मला वाचून अभिप्राय व काही त्रुटी उणीवा असतील सूचना करावी असे नम्रता पूर्वक सांगितले . (ह्याला मोठ्यांच्या छोट्या गोष्टी म्हणतात)सध्या वाचन हे हातातल्या मोबाईल वर होते हे जवळ जवळ सगळ्यानाच लागु पडते , तेही इंग्रजी च जास्त,पूर्वी पुस्तके आणून वाचायचो, पण आता एवढे मोठे पुस्तक आणुन वाचण्याचा कंटाळा येतो, माझा मराठी वाचण्याची संबंध बारावी परीक्षेच्या नंतर फक्त सकाळी घरी येणारा पेपर वाचणे एवढाच राहिला आहे लॉक डाऊन मध्ये तो ही संपला ,कारण विमा व गुंतवणूक क्षेत्रात काम करताना इंटरनेट वर जास्त माहिती ही इंग्रजीत मिळते, त्यामुळे असावा कदाचित, खरतर मी मुंबईत शाळा कॉलेजात शिकलेलो, त्यामुळे मराठी पिंड व अभिमान आपोआप आलेला आहे, बाळासाहेबांची भाषणे विचार ऐकून तरुणपणी एक उत्साह येत असे,अजून ही त्यांची भाषणे ऐकली की खूप स्फुरण चढते अंगातले रक्त सळसळते त्यांचा करिष्मा काही निराळाच !
एवढे सगळे सांगायचा उद्देश असा की कॉर्पोरेट जगातील इंग्रजाळलेल्या मी पुस्तक तीन दिवसात (घरातील कामे सांभाळुन )वाचून काढले. पुस्तक वाचताना असे जाणवले की माझा जीवनप्रवास ह्याच्याशी मिळता जुळता आहे, व साम्य आहे.
ह्यातील अनुभवकथन हे जसे घडले तसेच मांडले आहे त्यामुळे वाचणार्यांच्या मनाला ते सगळे भिडते. मी सरांना अभिप्राय कळवले व माझ्या मनातील लिखाण करण्याचा मानस बोलून दाखवला ,त्यांनी लगेच लिहिते व्हा असा संदेश दिला.
मी संकल्प केलाय माझ्या वाढदिवशी 22 तारखेला , माझे बरे वाईट अनुभव लिहिण्याचा,त्याप्रमाणे तीन कालखंड मध्ये विभागणी करतोय.
1 ) माझे बालपण ते शैक्षणिक जीवन
2)माझे करियर घडले ती कन्झ्युमर /सेवा उत्पादन (Fmcg) इंडस्ट्री जिथे मी माझ्या सेल्स करियर सुरुवात केली व वितरण Distribution मॅनेजमेंट अन संघ व्यवस्थापन(Team mgt) शिकलो हा एक 11 वर्षाचा अविस्मरणीय प्रवास...आणि
3) माझा विमा क्षेत्रात काम करताना अनुभवलेले गेल्या 12 /15 वर्षातले अविस्मरणीय दिवस , त्यात जोडलेली जीवापाड प्रेम करणारी माणसे.
काल पाठवलेला लेख खुप जणांना आवडला, आणि वायरल झाला माझ्या कॉलेज मित्राने नाव वाचून ओळखले व संपर्कही केला, अभिप्राय दिला व 30 वर्षानी आम्ही प्रथम बोललो...अजुन आनंदी होण्यासाठी काय पाहिजे ? त्यामुळे आता निर्धार पक्का!!! रोज मनातले नोटपॅड वर करणार!!!
भेटूच...आणि हो अभिप्राय द्यायचा बर का नक्की !!!
आपला
शिरीष शरद पाटील
WA:9890 333 611
M:shirishp2211@gmail.com
T:@shirishkeya
FB:#salestipsbyshirish
#sellingideasbyshirish
@shirishkeya
खूप छान. सातत्याने लिहीत रहा. शुभेच्छा
ReplyDeleteसर.....खुप छान.....लिखाण सुरू ठेवा....तुमच्या अनुभवातून आमच्या पिढीला मार्गदर्शन मिळत रहिल....all the best sir��
ReplyDeleteशिरीषजी,
ReplyDeleteखूप भारी वाटलं आपल्या वरचं (पाटील साहेब आमच्या डोक्यावर रहातात या अर्थानेच नव्हे, तर अनुभवाने) कोणीतरी लिहितं होतंय हे पाहून...लिहीत रहा..... खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद किरण....हो नक्कीच ..अजून खूप अनुभवकथन करतोय लवकरच पुढील लेख पोस्ट करतोय.
ReplyDeletedhanywad sir
ReplyDelete